लोकार्थ प्रतिनिधी
नांदेड : Safe Food Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत नांदेडच्या एमआयडीसी परिसरातील सियाराम इंडस्ट्रीज या मसाला उत्पादक कारखान्यावर अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याने कारखान्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
१४ ऑक्टोबर रोजी केलेल्या तपासणीत स्वच्छता, वायुविजन, कीड नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीसंदर्भात त्रुटी आढळल्या. यावेळी संशयास्पद दर्जाची ६४ किलो मिरची, हळद आणि धने पावडर, एकूण १९ हजार ३६० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला.



No Comment! Be the first one.