कलाशिक्षक सुभाष घुले यांनी 5 किलो रांगोळीतून 8 तासांच्या परिश्रमाने काढली देवीची रांगोळी
लोकार्थ प्रतिनिधी पंकज पवार अंबड
जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या अंबड येथील श्री मत्स्योदरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून आज (ता.14) बुधवारी चौथी माळ आहे.दरम्यान देवी मंदिराच्यासमोर देवीच्या विविध प्रतिकृतीच्या आकर्षक रांगोळी काढल्या जात असून या सुंदर व आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कलाशिक्षक सुभाष श्रीमंत घुले यांनी 5 किलो रांगोळी वापरून 8 तासांच्या परिश्रमातून देवीची आकर्षक रांगोळी काढली आहे.
त्यांना याकामी श्रीमती मनिषा जेथलिया, कलाशिक्षक रवींद्र जामदार सर,बाळू दळवे,गोविंद कायस्थ, संस्थान व्यवस्थापक कैलास शिंदे आदींचे सहकार्य मिळाले. सदर सुंदर रांगोळी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत असून प्रत्येक भाविक ही रांगोळी आपल्या मोबाईलमध्ये कॅच करून नेण्यासह या रांगोळीसोबत सेल्फीही घेत आहेत.यासाठी विशेषतः मुली,महिला भाविकांची मोठी गर्दी असते.
कलाशिक्षक सुभाष घुले व रविंद्र जामदार हे गेल्या अनेक वर्षांपासून श्री मत्स्योदरी देवीच्या नवरात्र उत्सवात आपला वेळ देवून मंदिरासमोर आकर्षक रांगोळी काढतात.त्यांच्या या रांगोळीचे म्हणजेच त्यांच्या कलाकारीचे सर्व भाविकांतून मोठे कौतुक होत आहे.

No Comment! Be the first one.