लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
परभणी : जल जीवन मिशनच्या पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छ आणि शुध्द पाण्याचे महत्व वाढवण्यासाठी तसेच अशुद्ध पाण्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विदयार्थ्यांना पाणी तपासणी प्रयोगशाळांची ओळख निर्माण व्हावी तसेच शुध्द आणि पिण्याच्या पाण्याचे महत्व विदयार्थ्यांना लक्षात यावे यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या पाणी तपासणी प्रयोगशाळामध्ये शालेय विदयार्थ्यांना पाणी नमुने तपासणीचे धडे मिळाले.
बुधवार दि 14 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक जयंत गाढे, वरिष्ठ भू – वैज्ञानिक चक्रधर चव्हाण यांच्या सनियंत्रणात शहरातील भारतीय बालविद्या मंदिर माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी परभणी येथील पाणी नमुने तपासणी प्रयोगशाळेला भेट दिली. यावेळी प्रयोगशाळेची संरचना, पाणी तपासणी कशी केली जाते तसेच पाण्याला अशुद्ध करणारे विविध घटक तसेच पाणी अशुद्ध होण्याची कारणे इत्यादी बाबत सविस्तर माहिती घेतली.
यावेळी रसायनी सुनील एस.के, पाणी गुणवत्ता तज्ञ अविनाश आरळकर, जिल्हास्तर नियंत्रण रसायनी रवी शिसोदिया, अनु जैविक तज्ञ दुष्यंत करजगावकर, प्रयोगशाळा सहाय्यक निवास खूपसे, मुख्याध्यापक एन व्ही, आळंदकर, विभागप्रमुख शेंडगे बी.बी, सहशिक्षक संगेवार, भारती यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा भेट आणि मार्गदर्शनासाठी विशेष परिश्रम घेतले.
No Comment! Be the first one.