लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
संभाजीनगर : शेंद्रा येथील ऑयस्टर स्कूलजवळ नागपूरकडे जाणारी खासगी प्रवासी बस भीषण अपघाताची शिकार झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील कठडा तोडून पुलाखाली कोसळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात येत असल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण आणि मृत-जखमींची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
No Comment! Be the first one.