लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
सोलापूर : मल्लिकार्जुन हायस्कूल येथे १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे सब ज्युनियर व ज्युनियर मुले-मुली संघ जाहीर करण्यात आले आहेत. सब ज्युनियर स्पर्धा जम्मू येथे, तर ज्युनियर स्पर्धा आंध्र प्रदेश येथे होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या सागर तांबे यांची निवड समितीत, तर खेळाडूंमध्ये ज्युनियर मुली गटातून तिथी प्रामाणिक हिची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. तसेच सब ज्युनियर मुलांमध्ये स्वप्निल दिलीप जाधव (कर्णधार), आयुष अतुल भांमरे (उपकर्णधार), प्रसाद बाळाभाऊ देवकर, शिवदर्शन शिंदे, कार्तिक भुईंबर आदींची निवड झाली आहे.
सब ज्युनियर मुली संघात स्नेहा ज्योतीराम पवार (कर्णधार), अनन्या बाबुराव राऊत (उपकर्णधार), आध्या मकरंद पाटील, मेहरूणीसा तस्लीमा शेख यांचा समावेश आहे. ज्युनियर मुली संघात ऋतुजा मगर (कर्णधार), तिथी प्रामाणिक (उपकर्णधार), पायल शिंदे, समीक्षा जाधव यांची निवड झाली आहे. सर्व निवड झालेल्या खेळाडूंचे राज्य संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले
No Comment! Be the first one.