ॲड. ब्रह्मानंद चव्हाण यांचा दावा खोटा – दिनकरराव देशमुख
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना शहरातील अंबड रोडवरील साडेसहा एकर जमिनीवरून वाद निर्माण झाला असून, या जागेच्या मालकी हक्कावरून अॅड. ब्रह्मानंद चव्हाण आणि दिनकरराव देशमुख यांच्यात मतभेद असल्याचे समोर आले आहे. ॲड ब्रह्मानंद चव्हाण यांनी सदर साडेसहा एकर जमीन आपलीच असल्याचा दावा केला आहे. मात्र, ॲड ब्रह्मानंद चव्हाण यांचा दावा खोटा असल्याची प्रतिक्रिया दिनकरराव देशमुख यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामराव खडके आणि दिनकरराव देशमुख यांनी संबंधित जमीन खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, ॲड ब्रह्मानंद चव्हाण यांनी या जमिनीवर आपला हक्क असल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर रामराव खडके यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. संबंधित जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून तसेच मालकी हक्कावरून सुरू असलेल्या या वादात आता नेमकी वस्तुस्थिती काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे दावे, जमीन खरेदीचे दस्तऐवज आणि अधिकृत महसुली नोंदी यांच्या आधारेच जमिनीच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता येऊ शकणार आहे.
No Comment! Be the first one.