लोकार्थ प्रतिनिधी
जालना : अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी जालना येथील डॉमिनोज पिझ्झा (मे. ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड) या आउटलेटचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.
१४ ऑक्टोबर रोजी केलेल्या तपासणीत शाकाहारी व मांसाहारी पिझ्झा एकाच ओव्हन व पॅनमध्ये तयार करणे, कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न होणे, तापमान नियंत्रणाच्या अपुऱ्या सुविधा, कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट आणि अन्न हाताळणीच्या ठिकाणी पाणी साचणे अशा त्रुटी आढळल्या. तपासणीत अन्न सुरक्षा निकषांचे पालन केवळ ६३ टक्के असल्याचे समोर आले. पुढील आदेशापर्यंत या आउटलेटमधील अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
No Comment! Be the first one.