लोकार्थ प्रतिनिधी
जळगाव : पावसाचा मोठा खंड पडल्याने राज्यात यंदा कापूस उत्पादनात लक्षणीय घट होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, खुल्या बाजारात आतापासूनच तेजीचे चित्र असून चांगल्या दर्जाच्या कापसाला खासगी व्यापाऱ्यांकडून ९६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. उत्पादनातली संभाव्य घट आणि बाजारातील मागणी लक्षात घेता आगामी काळात कापसाचा भाव १० हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
पूर्व हंगामी कापसापासून एकरी जेमतेम चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, कोरडवाहू कापसाचे एकरी ५० किलोही उत्पादन मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. उत्पादन ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक घटण्याच्या शक्यतेमुळे बाजारात कच्च्या कापसाची उपलब्धता यंदा कमीच राहण्याची चिन्हे आहेत.
No Comment! Be the first one.