आयुक्तांचा मोबाइल बंद; थेट पोलीस महासंचालकांना फोन, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर मंत्री शिरसाट यांनी थेट शहर पोलीस आयुक्तांवरच ताशेरे ओढल्याची माहिती आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर पोलीस आयुक्तांचा मोबाइल बंद असल्याने शिरसाट यांनी अखेर राज्याचे पोलीस महासंचालक यांना फोन लावला. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिरसाट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलीस आयुक्तांची तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. थेट पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला होणे आणि त्यानंतर पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होणे, यामुळे शहराच्या पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
No Comment! Be the first one.