लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : अंगावर पोलिसांचा गणवेश, खिशात ओळखपत्रे आणि सोबत पोलिसांचे साहित्य घेऊन आपण पोलीस असल्याचा बनाव करणाऱ्या तोतया पोलिसाचा सिटीचौक पोलिसांनी भांडाफोड केला आहे. राहुल रोहिदास सातकर (वय ३१, रा. चिखली, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने शहरातील सिटीझन लॉजमध्ये आपण पोलीस असल्याचे सांगून, खेळण्यासाठी आल्याचे कारण देत काही दिवस राहण्यासाठी खोली मागितली होती. त्यासाठी त्याने आधारकार्ड आणि पोलीस ओळखपत्रही दाखवले. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचा बनाव उघड झाला. त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांची ओळखपत्रे, विविध नेमप्लेट, गणवेश, बेल्ट, बूट, टोपी, रेनकोट, मोबाईल आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोकसेवक नसतानाही पोलीस असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No Comment! Be the first one.