मेळावा राजकीय किंवा जातीय स्वरूपाचा नसल्याचे स्पष्ट; लोकाग्रहास्तव उपस्थित राहणार
लोकार्थ प्रतिनिधी
भगवान भक्तिगडावर होणारा दसरा मेळावा ही परंपरा आहे. हा मेळावा कोणत्याही पक्षीय, राजकीय किंवा जातीय स्वरूपाचा नाही. त्यामुळे लोकाग्रहास्तव परंपरा जपण्यासाठी आपण भगवान भक्तिगडावर जाणार आहोत, अशी भूमिका राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडली.
गेल्या एक तपापासून भगवान भक्तिगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. या मेळाव्याला परंपरेचे महत्त्व असून, तो कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा जातीय समीकरणाशी जोडून पाहू नये, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
लोकांच्या आग्रहाचा मान राखत आपण भगवान भक्तिगडावर जाणार असल्याचे सांगत त्यांनी दसरा मेळाव्याबाबतची आपली भूमिका मांडली. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.