लोकार्थ प्रतिनिधी शरद मेहकरे लातूर
दिनांक 15 ऑक्टोबर 2026
श्री स्वामी समर्थ एज्युकेशन सोसायटी वांजरवाडा द्वारा विजयवर्धिनी माध्यमिक आश्रम शाळा जळकोट तालुका जळकोट येथे भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात डॉ. कलाम मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वागलगावे एम .आर .ज्येष्ठ शिक्षक श्री पाटील पी .डी .सर श्री कांबळे एस .जी सर श्री पंचडे आर. एस.सर पेद्यावाड एम. एम. सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पेद्यावाड सर यांनी केले व विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक श्री वागलगावे सर यांनी केला.
याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्याकडून वाचन करून घेण्यात आले तसेच हात स्वच्छ धुण्याची पद्धत व स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री कांबळे एस .जी .सर यांनी केले.
या कार्यक्रमास आश्रम शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No Comment! Be the first one.