लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे पैठण
मराठवाड्यातील वेगवेगळ्या शाखेतील खातेदारांच्या ठेवीमध्ये आर्थिक घोटाळा केल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रोजी अटक केलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को आँप क्रेडिट सोसायटीच्या दहा संचालकांचा पैठण पोलीस ठाण्यात सात दिवस मुक्काम राहणार आहे.
दरम्यान ज्ञानराधा मल्टीस्टेट को आँप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांची संचालक असलेली पत्नी अर्चना कुटे यांच्यासह दहा संचालकांना गुरुवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राम.जी हत्तरगे यांच्या पथकाने पैठण येथील प्रथम वर्गीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.७ ऑक्टोबर रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड, पैठण सह विविध दाखल गुन्ह्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ही अटक कारवाई करण्यात आल्याने ज्ञानराजातील खातेदारांनी, अटक करण्यात आलेले संचालक मंडळाला पाहण्यासाठी पोलीस ठाण्यासह न्यायालयात गर्दी केली होती.
ज्ञानराधा शाखेत पैशाची गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांच्या ठेवीमध्ये घोटाळा केल्या प्रकरणातील अटक करण्यात आलेले ज्ञानराधाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांची पत्नी संचालक अर्चना सुरेश कुटे, आशा पद्माकर पाटील, वसंत शंकरराव सटाले, दादाराव हरीदास उंदरे, रघुनाथ सुखराम खरसाडे, रविंद्र मधुकर तळबे, कैलास काशीनाथ मोहिते, रविंद्र श्रीरंग यादव, यशवंत वसंतराव कुलकर्णी, आणि वैभव यशवंत कुलकर्णी या आरोपीकडून विविध मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सदरील आरोपीला न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी दिल्यामुळे या आरोपीचा सात दिवस मुक्काम पैठण येथील पोलीस ठाण्यात राहणार आहे.

No Comment! Be the first one.