शेतकऱ्यांची दसरा दिवाळी गोड होणार
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या घोषणेत
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत राज्यातील ३ लाख २७ हजार २५० पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यात ₹३,१६०.४३ कोटींचा लाभ वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते हा लाभ वितरित करण्यात आला.
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देत त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १५ लाख ८५ हजार ४९३ पात्र शेतकऱ्यांना एकूण ₹१३,२७५ कोटींचे वितरण करण्यात आले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व मंत्री गणात संजय शिरसाट,दादा भुसे,गोरे तथा राज्यमंत्री मेघना साकोर बोर्डीकर या सह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

No Comment! Be the first one.