परभणीत दुष्काळी शेतात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन; तुटपुंज्या मदतीचा निषेध
लोकार्थ प्रतिनिधी गुणीरत्न वाकोडे परभणी
परभणी::दुष्काळाची मदत देवेंद्र फडणवीसांनी पाच हजार रु. जाहीर केल्याने स्वाभिमानी कडून दुष्काळ ग्रस्त शेतात देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे केले दहन…
नुकतीच राज्य मंत्री मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यानंसाठी ठोस मदतीची अपेक्षा होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळाने सर्व महाराष्ट्राची दुष्काळ पाहणी केली. त्यावर अधिकाऱ्यानं कडून पिकाचे पंचनामे झाले तरी राज्यात व प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता भयानक असताना राज्यातील शेतकऱ्यांना फक्त ५०००/- रु. पहिली मदत जाहीर केली. हि मदत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात राज्यातील शेतकऱ्यानं प्रति असलेली कटुता बाहेर आलेली आहे. या मुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन दुष्काळी शेतात करून या मदतीचा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी मराठवाडाध्यक्ष किशोर ढगे, राम गोळेगावकर, नागेश दुधाटे उपस्थित होते.
वार्तांकन:: गुणीरत्न वाकोडे परभणी
No Comment! Be the first one.