दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न – बामणीकर
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे नांदेड
नांदेड (म नेता)
जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये मदत जाहीर करून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे, अशी घणाघाती टीका छावा मराठा युवा महासंघाचे उपजिल्हाप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी केली आहे.पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत. शेतकऱ्यांनी पाच हजारात दिवाळी कशी साजरी करावी, हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आतापर्यंत कोणाच्याही दारात भीक मागायला गेला नाही. तर शेतकरी शेतात पिकवून अख्खा देश जगवतो. मात्र यंदा निसर्गाने साथ दिली नाही, त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पाच हजारात मुलांना कपडे घ्यायचे का, घरात रेशन घ्यायचे, जनावरांचा चारा आणायचा का, घेतलेले कर्ज फेडायचे, असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत.
मराठवाड्यात यंदा पाऊस अत्यंत कमी झाला. पेरणी केलेले सोयाबीन, कापूस, तूर, मूग यांसारखी पिके करपून गेली. अनेक ठिकाणी दुबार पेरणी करूनही पदरी निराशा आली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत पाच हजाराची मदत म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यासारखे आहे.
शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यायचा असेल, तर सरसकट कर्जमाफी, हेक्टरी ५० हजार रुपये मदत, पीक विम्याचे तातडीने वाटप आणि दिवाळीपूर्वी संपूर्ण मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे गरजेचे आहे. केवळ घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, असेही बामणीकर म्हणाल पांच हजार देऊन शेतकऱ्यांची थट्टा व जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न या भाजप सरकारने केला आहे येणाऱ्या काळात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय न घेतल्यास छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन विक्रम पाटील बामणीकर छावा मराठा युवा महासंघ उपजिल्हाप्रमुख नांदेड यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे म्हटले आहे.
No Comment! Be the first one.