लोकार्थ प्रतिनिधी
पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी ग्राहकाकडून जास्तीचे दोन रुपये घेतले म्हणून हॉटेल चालकाला ग्राहक मंचानं एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. उत्तर प्रदेशातल्या हाथरस शहरात एका हॉटेलमध्ये १८ रु. एमआरपी लिहिलेल्या पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये आकारण्यात आले. ग्राहकानं याबद्दल हाॅटेलविरुद्ध १० लाख रुपयांचा दावा ठोकला. उत्तर प्रदेश ग्राहक मंचासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मंचाने हॉटेलला दंड ठोठावला.

No Comment! Be the first one.