कुजलेला कच्चा माल, कालबाह्य व्हिनेगर; तपासणीत गंभीर त्रुटी उघड
परभणी : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा विभागाने १४ ऑक्टोबर रोजी वसमत रोडवरील येलदारकर कॉलनीतील डोमिनोज पिझ्झा आउटलेटवर कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी वैभव एम. ठोंबरे यांच्या तपासणीत कुजलेली शिमला मिरची, कालबाह्य व्हिनेगर, अन्नपदार्थ साठवणुकीतील तापमानाचे उल्लंघन आणि अस्वच्छता यांसह अनेक गंभीर त्रुटी आढळल्या.
शाकाहारी व मांसाहारी पिझ्झासाठी एकाच स्क्रीनचा वापर, कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा अभावही निदर्शनास आला. या त्रुटींमुळे अन्न सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने आउटलेटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला.



No Comment! Be the first one.