लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी,
दि.३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने परभणी येथील जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे पर्यवेक्षक तथा ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून अभिजात मराठी भाषा’ या विषयावर गहाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गहाळ यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषेची विविधता आणि आपली संस्कृती व मराठी भाषा या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बहारदार कथाकथन केले.
प्रस्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष धों. साबळे यांनी केले. तसेच स्पर्धा परीक्षेच्या विदयार्थ्यांनी तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त ग्रंथालयाचा तसेच ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचलन परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील लिपीक सचिन गायकवाड यांनी, तर आभारप्रदर्शन कोंडीबा गाडेवाड यांनी केले.
No Comment! Be the first one.