परळी वैजनाथ परिसरात पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. हनुमान गड परिसरात पाण्याच्या शोधात असलेली दोन हरणे आढळून आली आहेत.
लोकार्थ प्रतिनिधी, रवींद्र जोशी परळी वैजिनाथ
वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हनुमान गड परिसरात दोन हरणे पाण्याच्या शोधात आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनक्षेत्रात वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था आहे का? कृत्रिम पाणवठे आणि पाण्याच्या स्रोतांची नियमित देखभाल केली जाते का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दोन हरणे पाण्याच्या शोधात मानवी वस्तीच्या जवळ येत असतील, तर त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन परिसरातील पाणवठ्यांची पाहणी करावी आणि वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वन्यजीवांच्या तहानेकडे वन विभागाचे लक्ष कधी जाणार? हनुमान गड परिसरातील हे चित्र वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरत आहे.


No Comment! Be the first one.