हजरत टिपू सुलतान जयंती आणि संविधान दिनानिमित्त सामाजिक एकतेचा प्रेरणादायी उपक्रम
शहीद जवानांना व निष्पाप नागरिकांना अनोखी श्रद्धांजली;
लोकार्थ प्रतिनिधी सुशिल गायकवाड पूर्णा
रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून, एखाद्याला नवजीवन देण्याचे महान मानवतावादी कर्तव्य आहे. याच भावनेतून पूर्णा शहरात सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा अनोखा संदेश देणारे भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी शहीद-ए-वतन हजरत टिपू सुलतान (रह.अ.) यांच्या २७६ व्या जयंतीनिमित्त, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात तब्बल ४५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी जामा मस्जिद येथील कव्वाली स्टेजसमोर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हुजूर साहेब ब्लड सेंटर यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले. नांदेड येथील सुप्रसिद्ध वक्ते फारुख अहमद साहेब यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामा मस्जिदचे पेश इमाम मौलाना शमीम रिझवी होते. यावेळी मौलाना रशीद बरकाती यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमाला राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी नगराध्यक्ष संतोष अण्णा एकलारे, अब्दुल मुजीब सर, प्रकाश दादा कांबळे, हाजी खलील कुरेशी, रऊफ कुरेशी, जाकीर कुरेशी, उत्तम भैय्या खंदारे, रऊफ भैय्या बागवान, ज्येष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड शेख सलीम भाई सैलानी, शेख खुद्दूस भाई, राजू सोळंके, सलीम भैय्या सौदागर, प्रताप भैय्या कदम, अखिल अहमद, शेख हमीद बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, डॉ. विनय वाघमारे, डॉ. वाजीद, डॉ. वहीद, डॉ. हिलाल, ए. बी. शेख, शेख मुरतूजा, मुन्तजीब खान, साजिद पठाण, विरेश कसबे, तुषार गायकवाड, शेख आसिफ, शेख अनसार, इम्रान पठाण, राजकुमार सूर्यवंशी, वहीद कुरेशी, सिद्धार्थ मामा गायकवाड, शेख शफी भाई यांच्यासह शहरातील नागरिकांनी उपस्थिती लावली.
या रक्तदान शिबिराचे आयोजन हजरत टिपू सुलतान मित्र मंडळ, पूर्णा यांच्या वतीने शेख सरान भैय्या बागवान यांच्या पुढाकारातून करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शेख वसीम बिल्डर, समीर पठाण, अक्रम बागवान, सय्यद वासिम इंजिनिअर, तोफीक लाला, एम. डी. रऊफ, रियाज शेख, शेख आमेर, सोहेल बागवान, शेख अनवर अन्नू, सय्यद सलमान, शेख जावेद, शाहरुख बागवान, नईम बागवान, आसिफ बागवान, शेख गौस तारा आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार शेख अक्रम शेख हबीब यांनी मानले.
रक्ताच्या नात्यापलीकडील माणुसकीचा संदेश!
जात, धर्म आणि पंथाच्या भिंती ओलांडून माणुसकीच्या नात्याला सर्वोच्च स्थान देणारा हा उपक्रम पूर्णा शहरातील सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरला. शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण, संविधानातील समतेच्या मूल्यांचा आदर आणि गरजू रुग्णांना जीवनदान देण्याची भावना या तिन्ही गोष्टींचा संगम या रक्तदान शिबिरातून पाहायला मिळाला. रक्तदानाच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडत ४५ रक्तदात्यांनी मानवतेचा खरा धर्म जपला.


No Comment! Be the first one.