लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू कन्नड
कन्नड तालुक्यातील माळेगाव शिवारातील शेतातील विहिरीतून शेतीची पाणबुडी मोटार चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पिशोर पोलिसांनी जेरबंद करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दि. १५/०८/२०२६ रोजी माळेगाव ठोकळ येथील शेतकरी कैलास भागीनाथ ठोकळ यांनी पिशोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्यांच्या माळेगाव शिवारातील विहीर क्र. ४४ मधील शेतीसाठी बसविलेली मेघा कंपनीची ५ HP पाणबुडी मोटार (किंमत रु. २०,०००) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या तक्रारीवरून पोलीस ठाणे पिशोर येथे कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून १) हरीदास नारायण ठोकळ (वय ३५), २) भीमराव सोमींनाथ अहिरे (वय २८), दोन्ही रा. माळेगाव ठोकळ यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली ५ HP पाणबुडी मोटार हस्तगत करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत स्वामी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती अपरिजिता अनिहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोरचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, पोउपनि शाम गवळी, पोह दत्तू लोखंडे,विजय भोटकर, पो. कॉ.३६६ मस्के, पो. कॉ. ४०९ खंबाट व होमगार्ड नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.

No Comment! Be the first one.