आश्रमातील ३२ अनाथ मुलांना ४२ हजारांचा किराणा छत्रपती संभाजीनगर :
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
अन्न वाचवा समितीतर्फे दर महिन्याला एका गरीब व गरजू आश्रमाला जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप केले जाते. या उपक्रमांतर्गत बीड बायपास येथील स्वामी समर्थ बालक आश्रमाला ४२ हजार रुपये किमतीचे किराणा साहित्य नुकतेच वाटप करण्यात आले. शहरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येतो. स्वामी समर्थ बालक आश्रमात ६ ते १८ वर्षे वयोगटातील ३२ अनाथ मुले असून, आश्रमाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आश्रमचालकांनी समितीकडे किराणा साहित्य देण्याची विनंती केली होती. यावेळी अन्न वाचवा समितीचे प्रवर्तक अनंत मोटाळे, अजित राणा, रमेश कोयलवार, दिलीप आसबे, सुधा दरबास्तवर आणि डॉ. वैशाली मसलेकर उपस्थित होते.

No Comment! Be the first one.