विश्वमाई वारकरी शिक्षण संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम
लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरु
कन्नड – मानव सेवा हीच ईश्वर सेवा या पवित्र भावनेतून नवरात्र उत्सवानिमित्त विश्वमाई वारकरी शिक्षण संस्था, रेणुका माता मंदिर, कन्नड-बहिरगांव रोड, माळीवाडा* येथे आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.
दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात कन्नड तालुक्यासह परिसरातील शेकडो गरजू रुग्णांनी सहभाग नोंदवत मोफत उपचाराचा लाभ घेतला.
या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथून आलेली तज्ञ डॉक्टरांची टीम होती.
डॉ. ज्ञानेश सालगुडे (MD आयुर्वेद), संदीप देवराय (नॅचरोथेरपिस्ट), समाधान पल्हाळ (वरिष्ठ थेरपिस्ट), विवेक पाटील (थेरपिस्ट), आणि सुहास पिंपळवाडकर (फार्मासिस्ट) यांच्या संयुक्त टीमने रुग्णांची अत्यंत काळजीपूर्वक तपासणी केली.
या शिबिरात नाडी परीक्षण, नाभी सेटिंग, बोन सेटिंग, जानू बस्ती (गुडघेदुखी), कटी बस्ती (कंबरदुखी), आणि मन्या बस्ती (मानदुखी) या केरळीयन पंचकर्मातील महागड्या थेरपी पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. सोबतच गुरुप्रसाद आयुर्वेदिक स्टोअर च्या वतीने केरळीयम, धूतपापेश्वर सारख्या नामांकित कंपन्यांची औषधेही गरजू रुग्णांना मोफत वाटप करण्यात आली.
पाठदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, संधिवात, सायटिका यांसारख्या वात विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना या शिबिरामुळे मोठा दिलासा मिळाला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महंत देवदत्त गिरी महाराज, संस्थेचे अध्यक्ष विष्णू महाराज काळे, सचिव शिवदत्त महाराज राजगुरू,यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजक विश्वमाई वारकरी शिक्षण संस्था व रेणुका माता मंदिर ट्रस्टचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
डॉ. ज्ञानेश सालगुडे (MD आयुर्वेद)


No Comment! Be the first one.