दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त, परिसरात शांतता
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिल्लेखाना परिसरात मंगळवारी सायंकाळी जागेच्या वादातून दोन गटांत वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना घडली. शेजारी राहणारे नजीर भंगारवाले आणि अबरार बाली यांच्यात जागेवरून हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच डीसीपी झोन-१, एसीपी शहर विभाग आणि क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या परिसरात शांतता आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, घटनेबाबत अफवा पसरवू नयेत तसेच कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
No Comment! Be the first one.