लोकार्थ प्रतिनिधी
लातूर – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना जवाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. आता प्रत्येक लोकसभा, जिल्हा व विधानसभा एक पदाधिकारी निरिक्षक म्हणून काम पाहतील.
लातूर जिल्हा निरिक्षक पदी प्रदेश सरचिटणीस डॅा. जितेंद्र देहाडे यांची निवड करण्यात आली आहे. डॅा देहाडे यांनी नुकत्याच झालेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लातूर येथे उत्तम कामगिरी केली होती त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना संपूर्ण लातूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. या आधी त्यांच्याकडे लातूर शहर व ग्रामीण या दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी होती. डॅा देहाडे हे गेल्या २५ वर्षापासून कॉंग्रेस पक्षात विविध पदांवर कार्यरत आहेत तसेच ते देशमुख घराण्याचे निष्ठावंत म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.
No Comment! Be the first one.