वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपक्रम; प्राचार्य डॉ. उत्तम राठोड यांच्या हस्ते उद्घाटन
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
वाचनाची आवड वाढवून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने नूतन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. उत्तम राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले.
प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तके, चरित्रग्रंथ, ऐतिहासिक साहित्य आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथ मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी आणि वाचनातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग वैयक्तिक विकासासह समाजाच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. राठोड यांनी केले.
कार्यक्रमास प्रा. डॉ. सुरेश उगले,प्रा.विशाल पाटील प्रा. यु. के. हेसे, प्रा. डॉ. विकास गवई आणि प्रा. डॉ. शाम आवटे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचनातून ज्ञान, विचारांतून परिवर्तन! नियमित वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचार प्रगल्भ होतात आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी वाचनाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवून वाचन संस्कृती समृद्ध करावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
प्रदर्शनाच्या आयोजनासाठी ग्रंथपाल डॉ. एम. आर. काटकर, के. बी. गात, आर. डी. घनवट, एस. एन. पस्तापुरे आणि श्रीमती आर. बी. हुरदुके यांनी परिश्रम घेतले.
No Comment! Be the first one.