फायनान्स चालक, भागीदार व मॅनेजरसह आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
नांदेड मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह ९ आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत खालसा फायनान्स कंपनीचे संचालक व कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
या संवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी या गुन्ह्याच्या सखोल आणि निष्पक्ष तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. वजिराबाद व स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकांनी नांदेड व परभणी येथे धडक कारवाई करून चालक आरोपी हरप्रितसिंघ ऊर्फ मंटु नरेंद्रसिंघ मेजर अबचलनगर, सतपालसिंघ किशनसिंघ खालसा, शेख शोएब शेख मेहमुद या गुन्ह्यातील मुख्य पाहिजे आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना वजिराबाद पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रीया सुरु आहे.
या प्रकरणात यापूर्वी पोलीस ठाणे वजिराबाद आणि स्थानिक गुन्हे शाखा येथील विशेष पोलीस पथकांनी तातडीने कारवाई करत आरोपी जयकुमार ऊर्फ शेरा (भैय्या) भगवान गायकवाड, शेख अमेर शेख साहेब हुसेन, इम्रान खान शाहबाज खान यांना अटक करण्यात आली आहे. शेख मुदस्सीर शेख खदीर यास अटक करण्यात आली असून नमुद आरोपी शेख अहमद ऊर्फ असलम मोहमद बशीर, सुमेध शेकोजीराव डोईबळे यांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता ३१ आकटोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोविंद खैरे, विठ्ठल घोगरे, पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार तसेच विशेष तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल धुरपडे, बालाजी महाजन, पोलिस उपनिरीक्षक रमेश गायकवाड व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार पोलीस ठाणे वजिराबाद येथील पोलिस निरीक्षक अजित कुंभार, पोलिस उपनिरीक्षक सुनिल बुलंगे व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी पार पाडली आहे.

No Comment! Be the first one.