तीन पिडित महिलांची सुटका: सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – शहरातील सोनाईनगर येथील शिवसाई अपार्टमेंट येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून अवैध वेश्याव्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त केला असून तीन पिडित महिलांची सुटका केली आहे. याबाबत भाग्यनगर पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सोनाईनगर येथील शिवसाई अपार्टमेंट येथे पिडीत महिलांना पैश्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करुन घेत आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी शासकीय पंचासमक्ष एका सामाजिक कार्यकर्त्याला “बो गि-हाईक” म्हणुन शिवसाई अपार्टमेंट येथे पाठवले. बोगस गि-हाईकाने तिथे जाऊन वेश्यागमनासाठी इसम निश्चित करताच पोलिसांना ठरल्याप्रमाणे इशारा केला. इशारा मिळताच पोलीस पथकाने छापा टाकून घटनास्थळावर आरोपी रणजितकौर अजय तिवारी, धरमसिंग महीद्रसिंग अलग, दत्ता हरी उमरे, अशिष साहेबराव किर्तने, मनोज नामदेव सुर्यवंशी, महेश राजु वाघमारे सापडले. कारवाई दरम्यान कुंटणखान्यातुन एकुण तीन पिडीत महिला यांची सुटका करण्यात आली आहे. आरोपी हे या महिलांना प्रत्येकी पैशाची अमिष देऊन बळजबरीने वेश्या व्यवसाय करुन घेत होते. घटनास्थळावरुन वेश्यागमनासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकुण 34 हजार 360 रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकिरी रामेश्वर वेंजने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अतुल भोसले, स्थागुशा नांदेड पोलिस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस अमंलदार रितेश कुलथे, गणेश लोसरवाड , ज्ञानोबा कवठेकर, महिला पोलिस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, पोलीस अमंलदार अच्युत मोरे, यशोदा केंद्रे, दिपा कोठारे, सर्व नेमणुक यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
No Comment! Be the first one.