लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशातील सवैधानिक संस्थांच्या बाबतीत संशयाचे व संभ्रमांचे वातावरण पसरत असून त्यांचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नसल्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या पत्रकार परिषदेला आमदार डॉ तुषार राठोड, आ. अमरनाथ राजूरकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे, किशोर देशमुख उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगाच्या विरोधात संभ्रम निर्माण करत आहेत. तिन्ही आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व निर्णय हे सहमाताने घेतले आहेत. मात्र राहुल गांधी हे संशय व संभ्रमांचे वातावरण निर्माण करीत आहेत. मुख्य सचिवांना पाठविलेले पत्र हे निवडणूक विभागांशी संबंधित नव्हते मात्र राहुल गांधी वेगळाच अर्थ लावून जनतेत संशयाचे वातावरण निर्माण करीत आहेत. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले.
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत अशीच संभ्रम अवस्था निर्माण केली होती. त्यांचे धोरण दुटप्पी आहे. निवडणूकीत त्यांचा विजय झाला की, ईव्हीएम मध्ये गडबड नाही मात्र पराभव झाला की ईव्हीएम मध्ये गडबड झाल्याचे सांगून निवडणूक आयोगाला दोषी ठरविले जात आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मधील दोष दाखविण्याची संधी दिली होती. मात्र कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाला दोष देण्यापेक्षा कष्ट व आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले व जनतेत जाण्याचा सल्ला दिला. एसआयआरच्या माध्यमातून आरोप करण्यात येत आहेत. मात्र पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या मतदार संघात जास्त मते वगळली आहेत. त्याच मतदार संघात तृणमूल काँग्रेस पक्ष विजयी झाल्याचे सांगितले. बीएलए नियुक्त करुन एसआयआर प्रक्रिया पारदर्शक राबविण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No Comment! Be the first one.