लोहगाव, बिडकीन तेलवाडी येथे उप बाजार पेठ सुरू करण्याचा निर्णय
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे पैठण
पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत बिडकीन, उप बाजार पेठ सुधारणा व तेलवाडी येथे उप बाजार पेठ सुरू करणे , व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लोहगाव येथे नविन उप बाजार पेठ सुरू करण्याचा ठराव एकमताने घेतला असल्याची घोषणा आमदार विलास बापू भुमरे यांनी
सोमवार दि.२८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व सभासद यांची वार्षिक सर्वसाधारण सभा अभिनंदन मंगल कार्यालय येथे आमदार विलास बापू भुमरे, सभापती राजेंद्र नाना भुमरे, उपसभापती राम पाटील एरंडे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी वार्षिक नफा तोटा अहवाल सादर केला. त्यानंतर विविध संचालक मंडळाने ठराव मांडले. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात येऊन यामध्ये बिडकीन बाजार समिती सुधारणा करणे,तेलवाडी येथे कांदा खरेदीसाठी उप बाजार पेठ प्रस्ताव शासनाने मंजूर केला त्याला खा संदिपान भुमरे संकुल नाव देणे बाबत व लोहगाव भागातील शेतकऱ्यांची मागणी नुसार लोहगाव येथील शासकीय जागेवर उप बाजार पेठ मंजूर करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. यावेळी शेतकरी नामदेव तेजिनकर,कडूबाळ बोरूडे, आसाराम सोनवणे, बाबासाहेब मुळे, दत्तात्रय सुक्रे, लक्ष्मण लाटे, बाबासाहेब मुळे, सुरेश मिसाळ, ज्ञानेश्वर बोरूडे, नारायण सोनवणे, यांच्या सह संचालक रवींद्र काळे, बद्रीनाथ बोंबले, सचिन मोगल, विठ्ठल दोरखे, सुभाष मुळे, विनोद बोंबले, उपसभापती राम पाटील एरंडे, पंचायत समिती उपसभापती संजय लघाने, सतीश शेळके, राजेंद्र तांबे, साईनाथ व्होरकटे, नामदेव खराद, संभाजी तवार, यांच्यासह संचालक मंडळ, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.