मराठवाडा पदवीधर मतदार संघातून रासपचा उमेदवार विजयी होणार – अब्दुल मलिक
बालाजी वैजळ
नांदेड – राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माधवराव जानकर यांची ताकत माझ्या पाठीशी असून मराठवाडा पदवीधर मतदार संघातून राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार शेख अब्दुल मलिक अब्दुल खुदूस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
मराठवाडा पदवीधर मतदार संघातील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी ते नांदेड येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले राष्ट्रीय समाज पक्षाने मला उमेदवार म्हणून संधी दिली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली आहे. प्रचार यंत्रणा संपूर्ण मराठवाड्यात उभी करण्यात आली आहे. गावपातळीवर देखील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते अंग झटकून कामाला लागले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्यावर प्रेम करणारे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच विद्यमान आमदार सतिष चव्हाण यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. तीन वेळा आमदार असताना देखील त्यांनी काम केले नाही. एकदा निवडून गेले ते मतदारांच्या संपर्कात राहत नाहीत. मतदारांचे प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले आहेत. मी एक तरुण असून सर्व उमेदवारांचे वय झाले आहे. आता युवक जागृत झाले आहेत. बदल करण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. मी संपूर्ण मराठवाड्यात मतदारांशी संपर्क साधत असून पदवीधर युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. म्हणून मला विश्वास आहे की, मराठवाडा पदवीधर मतदार संघातून विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकते, गोविंदराम सुरनर, प्रा शिवाजीराव इंदोरे, अशोकराव हाके, नारायण कोपणार, साठे, डॉ बंडेवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
No Comment! Be the first one.