लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर सिडको जळगाव मार्गांवरील रेणुकामाता मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून सकाळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सतीश वैद्य – शकुंतला वैद्य यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
पहाटे पाच पासून सनई चौघडयाच्या मंजुळ स्वरांनी दिवसाची सुरुवात झाली. गाभारा विविध प्रकारच्या पुष्पानी सजले असून मोहक सजावटीने सुवर्ण गाभारा आणखीनच खुलून आला आहे. तर सायंकाळी सुरेख रोषणाई ने मंदिर उजळून निघाले आहे. नवरात्री मध्ये जवळपास २०० स्वयंसेवक मंदिरात भाविकांना सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत.
सकाळी नऊ वाजता वृषाली चारठाणकर यांच्या स्नेहम ही कला मंच यांनी आपली कला सादर केली तदुपारी तीन वाजता दत्त महिला भजनी मंडळ रंजना अशोक सामग व दिपाली वाडेकर यांनी भजन आणि त्यामध्ये भारुड असा विविधरंगी कार्यक्रम सादर केला. सायंकाळी आरती नंतर सरदार जाधव यांचा गजर जगदंबेचा हा कार्यक्रम संपन्न झाला.
सायंकाळी भक्तांच्या गर्दीने मंदिर फुलून गेले होते.
पोलीस प्रशासन, आरोग्य सेवा आणि स्वयंसेवकांच्या नियोजनातून भाविकांना सुलभरीतीने दर्शन घेता येत आहे.
रोज सकाळी ७. ३० वाजता महा आरती, ९ ते ११ भजन, दुपारी १२ वाजता महा आरती व साबुदाणा खिचडी प्रसाद. दुपारी १२. ३० नंतर सप्तशती पाठ, कुमकुमार्चन, कुमारिका पूजन, श्री सूक्त, कुंजीका सूक्त आदी. दुपारी ३ ते ५. ३० रोज वेगवेगळे भजनी मंडळ संगीत सेवा अर्पण करतील. रोज आरतीला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.


No Comment! Be the first one.