बाळासाहेब आणि टँकर….
लोकार्थ प्रतिनिधी
दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे. सत्ताधारी या विभागासाठी
काही करो अथवा न करो, शिवसेना मात्र कायम मदतीला धावून आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे शिवसैनिक जया गुदगे यांनी टंचाइच्या काळात मराठवाड्याला टँकरमधून मोफत पाणी पुरवलं. २००१ मध्ये तर त्यांनी मराठवाड्यासाठी टँकर सेवेचं उद्घाटन करण्यासाठी मुंबइत जाऊन थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच गळ घातली. बाळासाहेबही कार्यकर्त्याचं मन राखण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर आले आणि त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी पत्रकार संजय जेवरीकर आणि इतर हजर होते.

No Comment! Be the first one.