लोकार्थ मीडिया
नागपूर : अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.
युरोपात लोक रानटी अवस्थेत वावरत होते, त्यांना कपडे कसे घालायचे याचीही अक्कल नव्हती, तेव्हा माझ्या पूर्वजांनी जगातला पहिला संविधान ग्रंथ लिहिला, तो म्हणजे मनुस्मृती, असं भाष्य पोंक्षे यांनी गुरुवारी नागपुरात केलं. भारतीय प्राचीन ग्रंथसंपदा, संस्कृत भाषा आणि सांस्कृतिक वारसा यांचं महत्त्व सांगताना त्यांनी सावरकरांच्या विचारांचा दाखला दिला. यावेळी भाजप सरकार, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली.
राणी लक्ष्मी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारधारेवर आयोजित व्याख्यानात पोंक्षे बोलत होते. भारतीय ज्ञानपरंपरेपासून नव्या पिढ्या दूर गेल्याची खंत व्यक्त करत त्यांनी संस्कृत, वेद, उपनिषदे, पुराणे आणि महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासावर भर दिला.
No Comment! Be the first one.