आ राजेश विटेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी,
परभणी जिल्ह्यात या वर्षी भीषण दुष्काळ पडलेला असून खरीपाची जवळपास सर्वच पिके परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून गेलेली आहेत.
या वर्षी मराठवाड्यात दुष्काळ असताना देखील जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरण 90 % भरलेले होते. आज स्थितीला धरणामध्ये 78% जिवंत साठा उपलब्ध आहे
धरणाच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील मानवत, सोनपेठ, पाथरी, परभणी ग्रामीण या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे. त्याचबरोबर डाव्या कालव्यावर 97 हजार हेक्टर सिंचन परभणी जिल्ह्यातील होते.
या दुष्काळी परिस्थितीमध्ये रब्बी ज्वारीसाठी व इतर पिकासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्यांसाठी 3 आवर्तने सोडण्याचे नियोजन केले तर जायवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतकरी ज्वारी पिक घेऊन जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावू शकेल.
त्याचबरोबर प्रमुख अन्न असलेल्या ज्वारीचा प्रश्न मार्गी लागेल व शेतमजुरांचे, कामगारांचे होणारे स्थलांतर ज्वारी पिकामुळे बऱ्याच अंशाने थांबेल . रोजगार मिळेल म्हणून जायवाडी धरणातून रब्बी ज्वारी आणि चाऱ्याच्या पिकाकरिता 03 आवर्तने सोडण्याचे नियोजन तात्काळ कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन करण्यात यावे.
त्याचबरोबर एप्रिल मे 2027 या महिन्यात वाढणाऱ्या तापमानात जी पाण्याची टंचाई भासणार आहे त्याकरिता भविष्यासाठीही 02 रोटेशनचे नियोजन करण्याची गरज आहे
सोबतच कालव्याची दुरुस्ती व इतर तात्काल जी कामे करणे गरजेची आहेत ती जर वेळेवर केली तर टेल पर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळेल याचे देखील नियोजन दुष्काळी मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये होणे अपेक्षित आहे.
यासाठी तात्काळ कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन आवर्तनाचे याप्रमाणे नियोजन करावे अशा सूचना संबंधितांना द्याव्यात अशी मागणी आ राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

No Comment! Be the first one.