गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी केला विजयाचा आनंदोत्सव
लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली : संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून प्रतापसिंह पाटील विजयी झाल्याबद्दल हिंगोली शहरात महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. शहरातील गांधी चौक येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करून विजयाचा आनंद व्यक्त केला.
प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला.
या जल्लोषात हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनीष आखरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर अप्पा सराफ जिल्हा परिषद सदस्य माधवराव कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रवी शिंदे, हिंगोली विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे, काँग्रेस ओबीसी विभागाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष भास्कर पोले युवक काँग्रेस प्रदेश सचिव बंटी नागरे, डॉ. रमेश शिंदे, काँग्रेस हिंगोली शहर अध्यक्ष मिलिंद उबाळे मुजीब पठाण, धीरज काकडे गजानन गव्हाणे बापूराव पाटील वडतकर डॉ वेदांत मरळे ईश्वर उरेवार शंकर शिंदे बंडू आठरे शेख अमन विकी सराफ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांधी चौकात फटाक्यांच्या आतषबाजीने आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
No Comment! Be the first one.