लोकार्थ वृत्तसेवा
विधानपरिषदेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील २८ जागांवर झालेल्या निवडणुकांच्या निकालावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘A big fat ZERO!’ असे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला.
फडणवीस यांच्या या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले आहे.
“देवेंद्रजी, ट्विट करण्याची घाई इतकी की शेवटी ट्विट डिलीट करण्याची वेळ आली. स्वतःच्याच मतदारसंघात तोंडावर आपटल्यानंतर सत्यापासून पळवाट काढण्याचा आपला केविलवाणा प्रयत्न सुरू आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने टीका केली.
“ट्विट डिलीट करता येतं, सत्य नाही!” असे म्हणत काँग्रेसने भाजपच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, ‘मोदींचा बापही जाईल’ इतकंच नाही, तर चड्डी गँग आणि अंधभक्तांचा माजही लोकशाहीच्या ताकदीने पद्धतशीरपणे जिरवला जाईल, अशी आक्रमक भूमिका काँग्रेसने आपल्या पोस्टमधून मांडली.
दरम्यान, चार राज्यांतील विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर दोन्ही पक्षांकडून सोशल मीडियावर राजकीय टीका सुरू असून, या निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
No Comment! Be the first one.