आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते आठ कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
पैठण तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, आठ लाभार्थी कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील शकुंतला मधुकर चव्हाण, गजानन सुदाम शिंदे, मीरा सतीश जाधव, शितल राजू घनवट, कविता श्रीपाद महापुरे, मंगल रोहिदास तरटे, अर्चना बंडू आगळे आणि विष्णू कचरू घोरपडे या आठ लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
शासनाच्या नियमानुसार मंजूर झालेल्या या अर्थसहाय्यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार आहे.
यावेळी आप्पासाहेब निर्मळ, आबासाहेब गिरगे, तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार सतीश पेंडसे, कृष्णा ग्हसरुफ, तलाठी शितल झिरपे, गायके आदी उपस्थित होते.
No Comment! Be the first one.