भाजपा नेते देविदास राठोड यांच्या मागण्यांना फडवणीस यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड : मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक आश्वसन
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी मांडलेले सर्व विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले. तसेच, एस. टी. आरक्षणाच्या अहवालाबाबत आणि इतर सर्व मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या सोबत झालेल्या बैठकीत बंजारा समाजाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी विविध मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये एस. टी. आरक्षणाचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, ही समाजाची प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली. तसेच ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी शासनस्तरावर ठोस योजना राबवावी, राज्यातील प्रत्येक तांड्यावर पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, दुष्काळ निवारणासाठी विशेषतः तांड्यांसाठी शासनाकडून विशेष पॅकेज जाहीर करावे यासह तांडा वस्ती सुधार योजना, तांडा समृद्धी योजना अधिक प्रभावीपणे लागू करण्याची आणि बंजारा महामंडळाचा निधी गरजू व होतकरू युवकांना उद्योगासाठी सहज उपलब्ध करून दिला जावा, या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आल्या आहेत.
यावेळी बंजारा समाजाचे धर्मगुरू आ. बाबूसिंग महाराज आणि महंत सुनील महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी हा लढा असाच सुरू राहील, असा पुनरुच्चार यावेळी नेत्यांनी केला.
No Comment! Be the first one.