लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहन यांनी कठोर पावले उचलली असून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १६ जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनी सुचना देऊन गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे विरोधात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भाग्यनगर पोलीस ठाणे भाग्यनगर 2, विमानतळ 1, इतवारा 1, अर्धापूर 1 यांच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध करण्यात आल्या आहेत. हद्दपार करण्यात आलेल्या टोळ्यांचा पोलीस ठाणे निहाय सविस्तर तपशील भाग्यनगर 6 गुन्हेगारांना 1 वर्षासाठी नितुल पि. विनोद चव्हाण, ऋषिकेश ऊर्फ वेणु पि. अरुण कांबळे, शेख इस्माईल पि. शेख मुनिर, अन्वर अल्ली खान पि. अकबर अल्ली खान, धम्मदीप पि. संभाजी थोरात यांचा समावेश आहे.
भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 2 गुन्हेगारांना 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असून टोळी सदस्य अक्षय पि. केशव पांढरे, विशाल सिद्धार्थ गायकवाड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून टोळी सदस्य विश्वास परमेश्वर शिंदे, महेश बालाजी मुंडे, सय्यद इम्रान सय्यद चाँद या टोळीवर सन 2020 ते 2026 दरम्यान विमानतळ, शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात संगनमत करून मोटारसायकल चोरी करणे, जबरी चोरी करणे, मारहाण करून दुखापत करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे आणि कट रचून खून करणे व शस्त्र अधिनियम असे एकूण 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत असुन त्यांना 2 वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 2 गुन्हेगारांना 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असून आलेले टोळी सदस्य मुकेश ऊर्फ एमके चंदन, शेख मोबीन शेख गौस या टोळीविरुद्ध मुखेड, किनवट आणि लोहा पोलीस ठाण्यात सन 2023 ते 2024 दरम्यान कट रचून दरोडा टाकणे, कट रचून जबरी चोरी करणे व अवैध शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे एकूण 3 गुन्हे दाखल असुन त्यांना 1 वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 03 गुन्हेगारांना 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असून टोळी सदस्य दिगांबर अशोकराव मकरे, यशराज लक्ष्मण तुंगेवाड, परमेश्वर गोविंद शिंदे या टोळीविरुद्ध सन 2026 मध्ये अर्धापूर पोलीस ठाण्यात मारहाण करून जबरी चोरी करणे व धमकावणे असे सलग 2 गुन्हे दाखल असुन त्यांना 1 वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
No Comment! Be the first one.