लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड गंगापूर
गंगापूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील चोपडा आगाराने मागील पाच सहा मागील 35 वर्ष नियमित सुरू असलेली व मध्यंतरीच्या काळात बंद झालेली चोपडा ते पुणे बस गंगापूर मार्गे पुन्हा सुरू केली आहे. सदर चोपडा येथून सकाळी 6.00 वाजता निघेऊन धरणगाव, एरंडोल, भडगाव, चाळीसगाव, कन्नड, गल्लेबोरगाव, देवगाव रंगारी, लासुर स्टेशन, गंगापूर, नेवासाफाटा, घोडेगाव, अहिल्यानगर मार्गे पुणे जातीत मुक्कामी जाईल
पुणे येथून सदर बस सकाळी 7 वाजता निघून पुणे अहिल्यानगर, नेवासा फाटा, गंगापूर, लासुर स्टेशन, देवगाव रंगारी, गल्लेबोरगाव, कन्नड, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव मार्गे सायंकाळी परत चोपडा जाईल. ही सदर बस सुरू करण्यासाठी प्रवासी संघटनेचे श्री.कृष्णा भोसले यांनी जळगाव विभागाकडे विशेष प्रयत्न करून ही बस पुन्हा सुरू करणे केली सदर व सुरू करण्यासाठी जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक श्री. बोरसे, चोपडा आगार प्रमुख श्री संदेश शिरसागर यांनी विशेष सहकार्य केले.आज दि. 01/11/2026 रोजी या बसचे गंगापूर येथे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी गंगापूर सहाय्यक आगारप्रमुख श्री. सुभाष भापकर यांच्या हस्ते चालक जगदीश पाटील व वाहक राकेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कृष्णा भोसले, विजय जगताप सर, वाहतूक नियंत्रक बोडखे, प्रफुल्ल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

No Comment! Be the first one.