पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाडेकर यांची सरकारवर टीका
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे उद्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाडेकर यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली असली, तरी एवढ्या तुटपुंज्या रकमेत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार, असा सवाल नारायण वाडेकर यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि माजी आमदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी आणि पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होते, हे जाणून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आंतरवाली सराटी हे गाव दत्तक घेतले असल्याने त्या गावात जाऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती जाणून घ्यावी. पाच हजार रुपयांत शेतकरी कुटुंबाची दिवाळी कशी साजरी होणार, याची प्रत्यक्ष जाणीव करून घ्यावी, असेही वाडेकर यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांवर अतिवृष्टी, पीक नुकसान आणि आर्थिक संकटाचे सावट असताना केवळ पाच हजार रुपयांची मदत पुरेशी ठरणार नाही. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची गरज आहे. पालकमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान केवळ बैठका न घेता शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, अशी मागणी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाडेकर यांनी केली आहे.
No Comment! Be the first one.