४ कोटींच्या क्षमतावाढ कामाचे आ.प्रशांत बंब यांच्या हस्ते उद्घाटन शहरासह चार गावांतील शेतकऱ्यांचा ओव्हरलोडचा प्रश्न मार्गी लागणार
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर तालुक्यातील वीजग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ३३ केव्ही गंगापूर वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमतावाढ कामाचे उद्घाटन गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.यावेळी उपकार्यकारी अभियंता अरविंद काळे, सहाय्यक अभियंता भूमिका बनसोडे,सहाय्यक अभियंता चिंचाने साहेब,सहाय्यक अभियंता लंगोटे,भागचंद लांडगे यांची उपस्थिती होती.
यापूर्वी ५ एमव्हीए क्षमतेचा असलेला पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलून आता १० एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. सुमारे ४ कोटी रुपये खर्चाच्या या कामामुळे गंगापूर शहरासह परिसरातील वीजपुरवठ्याची क्षमता वाढणार आहे.
गंगापूर शहरात दररोज सकाळच्या वेळी होणारा वीजपुरवठ्यावरील अतिरिक्त ताण तसेच वारंवार निर्माण होणारा ओव्हरलोडचा प्रश्न या क्षमतावाढीमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच ७ केव्ही जामगाव व ११ केव्ही मांजरी फिडरवरील गंगापूर शिवार,जाखमाथा, आंबेवाडी आणि मांजरी शिवारातील कृषी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.विशेषतःशेतीपंपांसाठी वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत बंब यांनी तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.लवकरच आणखी एका पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे किशोर धनायत,
तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाणप्रदीप पाटील,भाग्येश गंगवाल,
डॉ.आबासाहेब शिरसाट,विजय पानकडे,आनंद पाटील,
सुरेश शिंदे,कृष्णा सुकाशे,गोपाल वर्मा,रज्जाक पठाण, रामेश्वर पाटील,दीपक साळवे राजेंद्र राठोड,दत्तू कराळे,
सुनील पाखरे, संदीप आमराव, प्रदीप वंजारे, दीपक बत्तीशे, अमोल लहिरे, काका दंडे, बाबासाहेब लांडे,संदीप मोरे, श्रवण राऊत, रावसाहेब मिसाळ, प्रदीप तोडकर, चंद्रकांत मोरे, कार्तिक पातारे, विकास डुकरे, किरण मनाळ,अमोल शिंदे यांची उपस्थिती होती.



No Comment! Be the first one.