पर्यायी व्यवस्था करा; अन्यथा तीव्र आंदोलन – डॉ. सतीश पाचपुते
लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली : एचएलएल कंपनीचे तब्बल १,१०० कोटी रुपये थकीत असल्याने राज्यातील डायलिसिस सेवा बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे हजारो डायलिसिस रुग्णांवर जीवघेणे संकट ओढवण्याची शक्यता असून, रुग्णांची मोठी हेळसांड होणार आहे.
सरकारने तातडीने थकीत प्रश्न मार्गी लावून डायलिसिस सेवेसाठी पर्यायी व्यवस्था करावी. रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते यांनी दिला आहे.
No Comment! Be the first one.