जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : अन्यायाविरोधात न्याय आणि नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील शोभा राणू बिरसने यांनी आज डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
बिरसने कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात कुटुंबातील सहा जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला होता. झालेल्या नुकसानीची भरपाई आरोपींकडून अथवा शासनाकडून मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.
२५ ऑक्टोबरपर्यंत न्याय न मिळाल्यास संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, आज शोभा बिरसने यांनी डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना रोखले.
No Comment! Be the first one.