३३ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया; आरोग्य विभागाच्या समन्वयातून शिबिराचे उत्कृष्ट नियोजन
लोकार्थ प्रतिनिधी सुशिल एस गायकवाड पूर्णा परभणी
पूर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा काळे येथे शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात डॉ. बोले यांच्या हस्ते एकूण ३३ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या.
कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील महिलांना आरोग्यविषयक सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये महिलांची आवश्यक आरोग्य तपासणी करून वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आरोग्य विभागाच्या नियोजनबद्ध कार्यामुळे शिबिर सुरळीतपणे पार पडले.
सदर शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिंदे तसेच पूर्णा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुरेश गिनगिने, डॉ. नंदकिशोर थटवले, डॉ. अभिजित पारवे, डॉ. त्र्यंबक भालेराव, डॉ. पल्लवी भताने यांच्यासह सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर, आशा स्वयंसेविका तसेच इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ३३ महिलांवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा काळे येथील आरोग्य यंत्रणेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
No Comment! Be the first one.