टाऊन हॉल उड्डाणपुलावर भीषण अपघात; २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.घटना cctv मध्ये कैद
छत्रपती संभाजीनगर : शहरातील टाऊन हॉल उड्डाणपुलावर मध्यरात्री भरधाव दुचाकीचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
मोहम्मद झिशान मोहम्मद अली (वय २१, रा. खोकडपुरा, पैठण गेट) असे मृत तरुणाचे नाव आहे. झिशान हा मित्राच्या काकूच्या अंत्यविधीला गेला होता. अंत्यविधी आटोपून दुचाकीवरून परतत असताना टाऊन हॉल उड्डाणपुलावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि भीषण अपघात झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या झिशानला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असलेल्या झिशानच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
No Comment! Be the first one.