मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित सेनगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोकार्थ प्रातिनिधी गोपाळ सातपुते
हिंगोली | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातींचे तात्काळ उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) लागू करण्यात यावे आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी सेनगाव तालुका ‘सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंब रोजी सेनगाव तहसीलवर कार्यालयावर विराट मोर्चा धडकला तसेच सदरील मागण्याची निवेदन सेनगाव तहसील कार्यालयामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविन्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाद्वारे राज्यांना अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक अधिकार दिला आहे. या निर्णयात ‘वास्तविक समानता अंतर्गत मागासलेपणा’ आणि ‘अपुरे प्रतिनिधित्व’ या निकषांना महत्त्व दिले आहे. देशातील कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी उपवर्गीकरण करणे काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.अनुसूचित जातींचे ‘वंचित अनुसूचित जाती’ (अ) आणि ‘इतर अनुसूचित जाती’ (ब) असे दोन गट करण्यात यावेत विद्यमान १३ टक्के आरक्षणापैकी ६ टक्के आरक्षण वंचित अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवावे, तर उर्वरित ७ टक्के आरक्षण इतर जातींसाठी ठेवण्यात यावे.
एका गटात पात्र उमेदवार नसल्यास दुसऱ्या गटातील उमेदवारास संधी द्यावी. तसेच, १९६० पासूनचा सेवा भरतीतील अनुशेष तातडीने व प्राधान्याने भरावा. शैक्षणिक प्रवेशात वंचित अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र ६ टक्के आरक्षण लागू करावे आणि विविध शासकीय योजना व उद्योगांमध्ये किमान ६ टक्के संधी राखीव ठेवाव्यात. उपवर्गीकरणानंतरची पहिली रिक्त जागा वंचित अनुसूचित जातींसाठी देण्यात यावी व बिंदुनामावलीत कोणताही व्यत्यय येऊ नये, याची दक्षता घ्यावी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात यावा तसेच मुंबई विद्यापीठास त्यांचे नाव देण्यात यावे.क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगातील शिफारशींची तात्काळ व प्रभावी अंमलबजावणी करावी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करून महामंडळाला १,००० कोटी रुपयांचा निधी द्यावा. तसेच, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे महामंडळास तात्काळ भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा सेनगाव शहरात साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौक निर्माण करून भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सभामंडप उपलब्ध करून द्यावा. राज्यातील मातंग समाजातील राज्यस्तरीय नेत्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे.
शासनाने केवळ औपचारिक समानता न ठेवता वास्तविक समानता साध्य करण्यासाठी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. या मोर्चादरम्यान अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, गणपत भिसे,राधाजी शेळके, व तसेच मातंग योद्धा ग्रुप व सेनगाव तालुका सकल मातंग समाज समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता

No Comment! Be the first one.