गाडीच्या काचा फोडून ओढून केली लोखंडी पाईप आणि गजाने मारहाण,हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरली विना नंबरची गाडी
लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे
केज :- आवादा एनर्जीमध्ये काम करीत असलेल्या एका परप्रांतीय इलेक्ट्रिक मॅनेजरच्या गाडीला दुसरी गाडी आडवी लावून अडवून त्याच्या गाडीच्या काचा फोडून ओढून बाहेर ओढून, हल्लेखोरांनी बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला करून पळून गेले. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला करण्यात आला आहे.
दि. ६ नोव्हेंबर रोजी आवादा एनर्जी या पवन चक्की प्रकल्पावर काम करीत असलेल्या आसाम राज्यातील बिमल कांतिदास वय ३८ वर्ष रा. बागडहर ता. पाथरकांडी जि. करीमगंज, हे प्रवास करीत असलेली स्कॉर्पिओ गाडीला गणेश काचुळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास हंगेवाडी ते मस्साजोग रोडवर त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून गाडी आडवी लावली. तर नंतर हल्लेखोरांनी बिमल कांतिदास बसलेल्या बाजूच्या गाडीच्या काचा फोडून दरवाजा उघडला आणि गाडीच्या बाहेर ओढून लोखंडी रॉड आणि पाईपने मारहाण करून जीवघेणा हल्ला केला. तसेच त्यांना जीवे मारण्याचा धमकी दिली. यावेळी
या हल्ल्यात बिमल कांतिदास ही गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी त्यांनी बिमल कांतीदास यांचा ड्रायव्हर शिवाजी गौतम केदार रा. सांगवी याला तू भांडणात पडलास तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली.
या प्रकरणी बिमल कांतिदास यांच्या तक्रारीवरून गणेश काचुळे आणि इतर दोघा विरुद्ध गु र नं ७०४/२०२५ भा न्या सं ११८(२),३५१(२),३५२, ३२४(४),३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉस्टेबल राजू वंजारे हे तपास करीत आहेत.
क्षुल्लक कारणावरून जीवघेणा हल्ला :- गणेश काचुळे हा आवादा कंपनीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता परंतु त्या संदर्भात बिमल कांतिदास यांनी ॲडमिन कडे तक्रार केल्यानेच काचुळे यांची गाडी आणि त्याला व त्याची गाडी कामावरून बंद केली असल्याचा संशया वरून त्याने अधिकाऱ्याला अडवून हल्ला केला.
तिघा पैकी दोन हल्लेखोरांची ओळख पटली :- बिमल कांतिदास यांचा पाठलाग करून रस्त्यात अडवून गाडीच्या काचा फोडून जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यातील एक आरोपी हा गणेश काचुळे तर दुसऱ्याच्या छातीवर गोंधळले असून तिसरा मात्र अज्ञात आहे.
No Comment! Be the first one.